नाशिक: गंगापूर रोडवर भरधाव मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत महिला ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): कॉलेजरोड परिसरातील क्रोमा शो रूम ते डॉन बॉस्को स्कूल दरम्यान भरधाव मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत ४९ वर्षीय महिला ठार झाली. सदर महिला भाजीपाला खरेदी करून रस्त्याने पायी आपल्या घराकडे जात होती. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

निधी निलेश वारे (४९ रा.गिरीराज अपा.मॅक्डॉन्ल्ड पाठीमागे कॉलेजरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. वारे या रविवारी (दि.७) सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या परिसरातून त्या भाजीपाला खरेदी करून घराकडे रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला.

क्रोमा शोरूम कडून त्या डॉन बॉस्को स्कूलच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ एचएच २७२५ या मालवाहू टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरण; मंडळ अधिकारी व निवृत्त अधिकाऱ्याला अटक

या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर सदर वाहनचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याबाबत पवन दिक्षीत (रा.पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790