नाशिक: अवैध दारु असलेल्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजच्या वाहनाचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मद्य तस्करांच्या गाडीचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या म्हणजेच एक्साईजच्या वाहनाचा चांदवड मनमाड रोडवर हरणूल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाला, तर दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एक्साईजच्या पथकाने सापळा रचत दारू वाहतूक करणारे वाहन दिसल्यानंतर पथकाने गाडी पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. मात्र पाठलाग करताना एक्साईजच्या वाहनाचा अपघात होऊन त्यांच्या वाहनवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला.

तर लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. चांदवड- लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या वाहनाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.

दारू जप्त करण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पथकाने चांदवड- लासलगाव रस्त्यावर सापळा रचला होता. राज्य उत्पादन शुल्क तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनातुन पाठलाग सुरु केला. यावेळी या वाहन चांदवडहून मनमाड रोड कडे पळाले.

या वाहनाला समांतर पाठलाग करत असतानाच या वाहनाने एक्साईजच्या वाहनाला कट मारल्यानंतर सीमा शुल्क विभागाचे वाहन हरणुल गावाजवळ थेट शेतात जाऊन पलटी झाले.यावेळी या वाहनाने तीन चार पलट्या घेतल्याने यात एक्साईज विभागाचे वाहन चालक कसबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी तात्काळ चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ व टिम दाखल झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतआहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790