नाशिक: गंगापूर धरणाजवळ कथडा तोडून कार नदीपात्रात! अपघातात एक ठार; दोघे जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दुगावकडून गंगापूर गावाकडे येत असलेली कारपुलाचा कथडा तोडून नदीपात्रात पलटी झाली. यात ३५ वर्षीय कारचालक जागीच ठार झाला तर, कारमधील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन बापू कापडणीस (३५, रा चांदशी) असे मयत कारचालकाचे नाव आहे. तर, किरण संजय कदम (३२), योगेश पानसरे (३४, दोघे रा. चांदशी) असे जखमींची नावे आहेत. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नितीन कापडणीस हे त्यांच्या कारमधून किरण व योगेश या दोघा मित्रांसमवेत दुगावकडून गंगापूर गावाच्या दिशेने येत होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

दुगावकडून गंगापूरकडे येताना हॉटेल गंमत-जंमतच्या अलिकडे गोदावरी नदीवर पुल आहे. तसेच पुलाकडे येताना उतारही आहे. या उतारावरून कापडणीस यांची कार येत असतानाच कापडणीस यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार काही कळायच्या पुलाचा कथडा तोडून नदीपात्रामध्ये पलटी झाली.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या विवाहितेचा जादूटोण्याच्या नावाखाली सासरी छळ; पतीसह सासू-नणंदविरुद्ध गुन्हा दाखल

नदीला पाणी नसल्याने कार खडकावर जाऊन पलटी झाल्याने कापडणीस यांस गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर कारमधील दोघे किरण व योगेश हे जखमी झाले. नाशिक तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी जखमींनी अपघाताची माहिती दिली. मयत कापडणीस यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790