नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी):वर्क फ्रॉ म होम आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून ६० लाख ५७ हजार ४४९ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरातील चौघांनी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी चौघांना २३ जानेवारीपासून इंटरनेट, फोन व सोशल मीडियावरून संपर्क साधत हा गंडा घातला. चौघांपैकी एकास भामट्यांनी वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवले. सुरुवातीस पैसे मिळत असल्याचे भासवले.
त्या आमिषाला बळी पडून या व्यक्तीने भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात २३ लाख १४ हजार ३४९ रुपये टाकले. विविध टास्क देत या व्यक्तीस टास्क पूर्ण केल्यानंतर जादा पैसे मिळत असल्याचे सांगितले. एका महिलेसह इतर दोघांना भामट्यांनी व्हॉट्सअॅप, टेलिग्राममधील ग्रुपमधून संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तिघांना ३७ लाख ४३ हजार १०० रुपयांचा गंडा घातला.
व्हर्चुअल अॅपद्वारे गुंतवलेले पैसे वेगाने वाढत असल्याचे तिघांनाही दाखवले. मात्र तिघांनी पैसे परत मागितले असता भामट्यांनी पुन्हा पैशांची मागणी केल्याने फसवणूक होत असल्याचा संशय आला.