नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे रविवारी पहाटे शहरात आगमन झाले. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. हवामान केंद्रात रविवारी सकाळी ८. ३० ते सायंकाळी ५. ३० दरम्यान १९ मिलिमीटर इतकी नोंद झाली असून ४ जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या पावसामुळे सिडको, सातपूर, त्र्यंबकरोड, शरणपूररोड, मुंबईनाका, द्वारका, गंगापूररोड, पंडित कॉलनी, तिडके कॉलनी, आडगाव, म्हसरूळ, पंचवटी भागातील रस्ते जलमय झाले. वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. या पावसामुळे शहराच्या काही भागांत वीज खंडित झाली.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790