🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: ५० वर्षीय शेजा-याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील शिवशक्ती चौकात घरात बोलावून घेत एका ५० वर्षीय शेजा-याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलीसांनी अटक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  रुमाल खरेदीचा बहाणा; दुकानदार महिलेचे ६० हजारांचे मंगळसूत्र खेचले

रामदास बापूश्री पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित इसम तिचा शेजारी आहे. रविवारी संशयिताने पाण्याची बादली भरून आणण्यास सांगितल्याने मुलगी पाणी घेऊन त्याच्या घरी गेली असता संशयिताने तिचा विनयभंग केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

यावेळी त्याने आजोबासह आई वडिलांकडे याबाबत वाच्यता केल्यास तुला मारेल असा दम भरल्याने भेदरलेल्या मुलीने घरी जावून आपल्या कुटुंबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत करीत आहेत. (अंबड पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४१९/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790