नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): टेलिग्रामवरून ऑनलाईन टास्क देऊन अनेकांच्या आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या असताना, त्यात आणखी भर एका डॉक्टरची पडली आहे. सायबर भामट्यांनी या डॉक्टरला ऑनलाईन टास्कसाठी आर्थिक आमिष दाखवून तब्बल दोन लाखांना गंडा घातला आहे.
योगेश पांडुरंग गायधनी (रा. गायधनी निवास, टिळक पथ, नाशिक ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना ५ जून रोजी त्यांच्या मोबाईलवर टेलिग्राम ॲपवरून संशयित अनिका शर्मा हिने फोन करून ऑनलाईन टेलिग्रामवरून टास्क पूर्ण केल्यास चांगल्या पैशांची कमाई करता येईल असे आमिष दाखविले.
तर, सायबर भामटे संशयित अमित जिदांल व कस्टमर सर्व्हिस देणार्या संशयितांनी डॉ. गायधनी यांना वारंवार फोन करून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच, त्यांना टास्क दिले. डॉ. गायधनी यांना पैशांचा परतावा दिला नाही. सदरील टास्कचा परतावा मिळविण्यासाठी भामट्यांनी डॉ. गायधनी यांना या ना त्या कारणावरून युपीआय आयडीवरून पैसे भरण्यास सांगून तब्बल १ लाख ८१ हजार ९५० रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात आयटी ॲक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७५/२०२४)
![]()

