नाशिक: तब्बल २.९० लाखांचे ड्रग्ज जप्त; एकाला अटक !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शुक्रवारी एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या पेडलरला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुलशन कॉलनी, पखालरोड येथे ही कारवाई केली. संशयिताकडून दोन लाख ९० हजारांचे ५८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.

शहबाज मजिद पठाण (रा. खडकाळी) असे या संशयिताचे नाव आहे. याकरणी मुंबईझाका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथक मुंबईनाका परिसरात गस्त करत असताना एमडी ड्रग्ज विक्री करण्याकरिता एक संशयित येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने परिसरात सापळा रचला. मोपेडवरून एकजण येताना दिसला. त्याला थांबवले असता त्याने पळण्याचा प्रयत्न केला.

पथकाने त्याला जागेवर पकडून अंगझडती घेतली असता खिशातून ५८ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. चौकशीत शैलेश तेलोरे (रा. मुंबई) याच्याकडून एमडी विकत घेतल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी नाशिकरोड येथील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवरही पोलिस तपास करत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त  संदिप मिटके यांच्या  सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भोई, पोलीस हवालदार: किशोर रोकडे, ताजणे, गायकर, पोलीस नाईक: योगेश चव्हाण, जगझाप, कोल्हे, दत्ता चकोर, दिघे, पोलीस अंमलदार अनिरूध्द येवले, बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, निकम, भड, कदम  यांनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790