नाशिक: जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा फरार संशयित अटकेत

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल जिवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या संशयिताला अटक करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाने देवळाली कॅम्प येथे ही कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभमेळ्याच्या रस्ते कामांना गती द्या; विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा

संशयित संजय जाधव असे नाव बदलून वास्तव्य करत होता. सुशील ऊर्फ गोरख रामभूल बेद (३७) असे या संशयिताचे नाव आहे. पथकाचे प्रवीण चव्हाण, गणेश भागवत यांना माहिती मिळाली की, कॅम्प परिसरात एक इसम नाव बदलून रहात आहे.

पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला आपले नाव संजय जाधव असे सांगितले. मात्र त्याच्या बोलण्यावरून संशय आल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले खरे नाव सुशील ऊर्फ गोरख रामभूल बेद असे सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल

त्याची सखोल चौकशी केली असता १९ जानेवारी २०२३ मध्ये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी शिकलकर यांना तीन संशयितांनी बेदम मारहाण करत प्राणघातक हत्याराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील संशयित बेद हा फरार होता. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790