नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भद्रकाली परिसरामध्ये कोयता बाळगून दहशत माजविणाऱ्याच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
असलम लतिफ खान (२०, रा. फकिरवाडी, दरबाजरोड, भद्रकाली) असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना संशयित असलम खान हा गुमशा बाबा दर्गा परिसरात हातात कोयता बाळगून दहशत माजवत फिरत असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुरेश माळोदे, रमेश कोळी, शरद सोनवणे, अप्पा पानवळ, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, किरण शिरसाठ यांच्या पथकाने शिताफीने संशयित असलम यास अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास त्यांच्या ताब्यात देण्यात आले.