नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शिरसगाव येथे सुखोई विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निफाड तालुक्यातील शिरसगाव, कोकणगाव शिवारात हे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत पायलट जखमी झाले असून थोडक्यात बचावले आहेत. तर ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे विमान कोसळले त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, शिरसगाव येथे लढाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट जाऊन पाहणी केली. तसेच वैमानिकांची विचारपूस केली.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790