नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मध्य रेल्वेतर्फे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व ठाणे येथील मेगा ब्लॉकमुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या जवळपास १३ रेल्वे शनिवारी (दि. १) रद्द करण्यात आल्या.
रविवारीही (दि. २) नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या पंचवटी, तपोवन, राज्यराणी, धुळे-मनमाड-मुंबई पर्यायी गोदावरीसह ११ गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
६३ तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकला शनिवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला असून रविवारी (दि. २) मध्यरात्री तो संपणार असून सोमवारपासून वाहतूक पूर्ववत सुरू होईल, असे सांगण्यात आले.
पंचवटी, तपोवनसह आज या गाड्या रद्द: मनमाड-मुंबई पंचवटी, मुंबई-नांदेड तपोवन, मुंबई-साईनगर वंदे भारत, मुंबई-मनमाड-धुळे, धुळे-मनमाड-मुंबई, मुंबई-हिंगोली जनशताब्दी, मुंबई-नांदेड राज्यराणी, जालना-मुंबई वंदे भारत, मुंबई-जालना वंदे भारत, मुंबई-जबलपूर गरीब रथ, मुंबई-हावडा दुरांतो
मराठवाड्याकडून येणाऱ्या आणि दौंड- पुणेमार्गे धावणाऱ्या आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक मात्र पूर्ववत होते. उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या अनेक प्रवासी गाड्या पाच ते दहा तासांच्या विलंबाने धावत होत्या. कुर्ला जंक्शन स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या काहीशा विलंबाने धावत होत्या. वीकेंडला जम्बो मेगा ब्लॉक घेतल्यामुळे सुट्टीच्या निमित्ताने आपल्या इच्छितस्थळी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली तर अनेकांनी प्रवास टाळला.