नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वाखारी या गावात एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबातील पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या केल्याचं समजतंय. या हत्या आर्थिक किवा अनैतिक संबंधांतून केल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वाखारी गावातील जेऊर रोड भागात हे कुटुंब राहत होते. समाधान चव्हाण (वय,३७), भरताबाई चव्हाण (वय,३२), गणेश चव्हाण (वय,६), आर्या चव्हाण (वय,४) अशी मयतांची नवे आहेत. समाधान चव्हाण हे रात्रीच्या वेळी आपली पत्नी आणि २ मुलांसह घराच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत झोपले होते. त्यावेळी अज्ञात इसमांनी चौघांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यावर अप्पर पोलीस मालेगाव, नांदगाव पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत.
9 Total Views , 1 Views Today