नाशिक: वैभव लहामगेच्या पोलिस कोठडीत वाढ

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): कुस्तीपटू भूषण लहामगे यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव यशवंत लहामगे याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.२१) वाढ करण्यात आली आहे. तर वैभवच्या आई- वडिलांची न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे. नाशिक- मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे कुस्तीपटू भूषण लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांची १० मे रोजी वैभव यांच्यासह साथीदारांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली होती.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

या प्रकरणी संशयित यशवंत लहामगे, वैभव लहामगे, सुमनबाई लहामगे यांनी कट रचून भुषणची हत्या केल्याचा गुन्हा वाडीवर्हे पोलिसात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुरुवारी (ता.१६) न्यायालयात हजर केले असता वैभवच्या पोलिस कोठडीत वाढ तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

या हत्येत वैभवसोबत सतीश चौधरी व रतन जाधव (दोघे रा. सिडको) या दोघा संशयितांचाही सहभाग समोर आला आहे. या दोघांनीच जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत घरफोडी करून सुमारे ५ कोटी रुपयांचे दागिने चोरल्याचे उघड झाले आहे. दोघे संशयित फरार असून शहर व ग्रामीण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790