नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पीडित महिलेला बदनामीची धमकी देऊन पाच वर्षे बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिलेशी आरोपी पगारे (रा. पंचवटी, नाशिक) याने मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्यानंतर तिच्या भावनिकतेचा फायदा घेतला व आरोपी पगारे याने तिची संमती नसताना तिच्यावर जून 2019 ते दि. 11 मे 2024 या कालावधीत त्र्यंबक रोड येथील हॉटेल, मखमलाबाद रोडवरील हॉटेल, तसेच आरोपीच्या राहत्या घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले; मात्र शारीरिक संबंधास पीडितेने नकार दिला असता आरोपी पगारे याने पीडितेला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली
या प्रकरणी पीडितेने पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दिली असून, पगारे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बागडे करीत आहेत. पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३१६/२०२४