नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): घरातील कुटुंबीय बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या खिडकीचे गज कापून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड असा २ लाख ७४० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना मखमलाबाद येथे घडली.
याबाबत प्रवीण बापू कन्नोर (वय ३४, रा. अहिल्यादेवीनगर, मु. पो. ता. नांदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे वडील कामावर, तर आई धुळे येथे नातेवाईकांच्या घरी गेली होती, तसेच भावजय व भाचा हे कन्नोर यांच्या बंगल्याला कुलूप लावून कन्नोर यांच्या बहिणीच्या घरी जेवणासाठी मुक्कामी गेले होते.
ही संधी साधून अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. यावेळी अज्ञात चोरट्याने घरातील हॉलमधील टीव्ही, तसेच बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाट उघडून त्यात असलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ७४० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.
हा प्रकार दि. १३ व १४ मेदरम्यान मखमलाबाद येथील मानकर मळ्यात घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोज करीत आहेत.