नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय होम फायनान्समधून चार कोटी ९२ लाखांचे १३ किलो सोने चोरी प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि शुक्रवारी (दि. १०) वाडीवऱ्हेत झालेल्या पहिलवान खून प्रकरणातील फरार संशयित वैभव लहामगे यास वाडीव-हे पोलिसांनी ठाणे ग्रामीणमध्ये अटक केली. खून प्रकरणातही लहामगेसह सतीश चौधरी, रतन जाधव यांचा समावेश असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. दोघांच्या मागावर वाडीव-हे आणि गुन्हे शाखेचे पथक आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयसीआयसीआय होम फायनान्समधील कर्मचारी तुकाराम गोवर्धने याने वाडीव-हे येथील वैभव लहामगे यास सांगत चोरीचा प्लॅन केला. लहामगे याने संशयित जाधव, चौधरी या दोघांना सांगून सोन्याची चोरी केली. पथकाने संशयितांचा सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून गोवर्धने यास अटक केली. त्याच्या चौकशीत तिघांची नावे समोर आली आहेत. संशयित चौधरी याची आई रेखा चौधरीच्या घरातून पथकाने ४० लाखांची सोन्याची लगड जप्त केली.