नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अंबड मोरे मळा, एकदंतनगर रस्त्यावर शनिवारी (दि. ११) सायंकाळी ७.३० च्या सुमारास एका मद्यपी करचालकाने वेगात कार नेत जखमी शिवण्या रस्त्याने ५ ते ६ नागरिकांना धडक दिली. यात एक ६ वर्षाची चिमुकली जखमी झाली आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला.
अंबड येथे मोरे मळ्याकडे जाण्यासाठी एकदंत नगरकडून जाणाऱ्या रस्त्यावर कार (एमएच ०१ बीजी ८९४९) वेगाने जात होती. या कारच्या चालकाने या रस्त्याने जाणाऱ्या ६ नागरिकांना धडक दिली. हा कारचालक या रस्त्याने जात असताना अपघात करतच पुढे निघून गेला. यात त्याची नंबर प्लेट रस्त्यात पडली. त्यावरून काही नागरिकांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. मात्र कारचालक वेगाने पुढे निघून गेला.
कारच्या धडकेने रंजना खेत्रे (३९), शिवण्या खेत्रे (६), उमाकांत पाटील (३२) यांच्यासह इतर तीन नागरिक जखमी झाले. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात शिवण्या ही ६ वर्षाची चिमुकली जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने ती खूप घाबरली होती. फरार झालेल्या कारचालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.