नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी करत खंडणी वसूल करणाऱ्या संशयित वैभव देवरे यास शुक्रवारी (दि.१०) चौथ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. देवरेवर विविध सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या गळ्याभोवती चौकशीचा फास घट्ट आवळला गेला आहे.
फसवणूक व विनयभंगाच्या गुह्यात त्यास यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. देवरे याला मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. चौथ्या शुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
फसवणुकीचे पाच तर विनयभंगाचा एक असे सहा गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नविता घुगे, दीपक वाघ, लक्ष्मण महाले, रामकृष्ण पारखे यांनी मध्यवर्ती कारागृहात जाऊन देवरे याला ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
⬜ फिर्यादी प्रदीप यादवराव बुवा (४१, रा. जयराज ब्लोसम अपार्टमेंट महाजन नगर अंबड रोड, नाशिक) यांचा भिक्षुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी देवरेकडून २०१९-२० मध्ये व्याजाने पैसे घेतले होते.
⬜ त्यापोटी २४ लाख रुपये देऊनसुद्धा राहते घर जबरदस्तीने नावावर करून घेतले म्हणून संशयित आरोपी वैभव यादवराव देवरे व निखिल पवार यांच्याविरुद्ध अवैधरित्या सावकारी केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल करण्यात आला होता.