नाशिक (प्रतिनिधी): शंकराचार्य न्यासाच्या गंगापूर धबधब्याजवळ असलेल्या बालाजी मंदिरात शुक्रवारी (दि. १०) अक्षव्य तृतीयेनिमित्त भाविकांना गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येणार आहे.
गेल्या १० वर्षांपासून न्यासातर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. सकाळी आरती झाल्यानंतर ९ ते १२ या वेळेत भारतीय पेहरावात दर्शन घेता येईल. यानिमित्त ब्रह्मचैतन्य विष्णुसहस्त्रनाम मंडळातर्फे (गीता फाउंडेशन) विष्णुसहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पारायण सकाळी १० ते ११ दरम्यान होईल. भाविकांनी लाभघ्यावा, असे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790