नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): डीजीपीनगर भागात भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने तरूण चालकाचा मृत्यू झाला. या अपघातात डबलसिट प्रवास करणारा तरूणही गंभीर जखमी झाला आहे, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निखील नरहरी पोतळे (२२ रा.पाटीलनगर,सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघातात योगेश घोडके नामक युवक जखमी झाला आहे. पोतळे व घोडके हे दोघे मित्र मंगळवारी (दि.७) रात्री सिडकोतून नाशिकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
डीजीपीनगर येथील संतोषीनगर परिसरात भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने दोघे मित्र जखमी झाले होते. त्यातील निखील पोतळे यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.