नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ५२ गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
यंदा प्रथमच या गुन्हेगारांशी संबंध असलेल्या त्यांच्या मित्रांनाही तडीपार केले आहे. पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबई नाका, गंगापूर या सात पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५२ सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
म्हसरूळ आडगाव लिंक रोडवर जवानाच्या खून प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात असलेल्या ३ संशयितांच्या ६ मित्रांना तडीपार करण्यात आले. विशेष म्हणजे या संशयितांवर गुन्हा दाखल नाही. मात्र गुन्हेगारांशी संबंध असल्याने प्रथमच थेट तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारांशी संबंधितांवर कारवाई: गुन्हेगारांशी संबध निष्पन्न झालेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहभाग नसला तरी संशयितांकडून गुन्हेगारांना न्यायालयात कारागृहात भेटणे, त्यांना अर्थ साह्य करणे हा देखील गुन्हा असल्याने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.