नाशिक: मोटारसायकल ट्रायलचा बहाणा करून लाखाची दुचाकी पळवली

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सारडा सर्कल भागात मोटारसायकल खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने ट्रायलचा बहाणा करून लाखाची दुचाकी पळवून नेल्याची घटना घडली. भामटा दुचाकी घेवून न परतल्याने दुचाकी विक्रेत्याने पोलिसांत धाव घेतली असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

फिरोज शौकत शहा (रा.अशोका मार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. शहा यांचा सारडा सर्कल भागात न्यु वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. या ठिकाणी दुचाकी खरेदी विक्री केली जाते. गेल्या २७ एप्रिल रोजी या ठिकाणी अनोळखी ग्राहक आला होता. ग्राहकाने वाहन बाजारात विक्रीसाठी पार्क करण्यात आलेली सुमारे एक लाख रूपये किमतीची एमएच १५ जेई ५६२२ या केटीएम स्पोर्टस बाईक खरेदीची तयारी दर्शविली.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

त्यामुळे त्याच्या ताब्यात ट्रायलसाठी दुचाकी दिली असता अनोळखी तरूण वाहनासह पसार झाला असून त्याचा शोध घेवूनही तो मिळून न आल्याने शहा यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790