नाशिक: अॅग्रो टुरिझमसाठी कर्ज देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शेतात अॅग्रो टुरिझम सुरू करण्यासाठी २ कोटीचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष देत २ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंडच्या संचालकाविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

पोलिसांनी दिलेली माहिती आणि गणेश माळोदे (रा. आडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत सुधीर चव्हाण याने ब्रिज असोसिएट्स मुलुंड, मुंबई या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून शेतात अॅग्रो टुरिझमकरिता २ कोटींचे कर्ज काढून देण्याचे आश्वासन दिले. डीड करण्याकरिता ३ लाख ६५ हजारांच्या रकमेचा धनादेश, मिळकतीची कागदपत्रे, मित्र कुंदन चौधरी (रा. तपोवन) येथे दिले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

संशयिताने चेक वटवून घेतले. काही दिवसांनी कर्ज मंजूर झाल्याचे पत्र मोबाइलवर पाठवले. मात्र कर्जाची रक्कम बँकेत जमा केली नाही. पैशांची मागणी केल्यानंतर संशयिताने १ लाखांची रक्कम फोन पे वर पाठवली, मात्र उर्वरित रक्कम आणि मूळ कागदपत्रे परत न देता फसवणूक केली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790