नाशिक: भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील आयटीआय भागात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नितीन नथू अहिरे (४५ रा.ओम बजरंग रो हाऊस श्रमिकनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अहिरे शुक्रवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून नाशिककडून सातपूरच्या दिशेने प्रवास करीत होते. आयटीआय सिग्नल ते सकाळ सर्कल दरम्यान भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. दुभाजकावर दुचाकी आदळल्याने ते पडले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने खासगी अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषित केले. अहिरे यांच्या पश्चात २ मुले, बायको आणि आई वडील असा परिवार आहे. अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.       

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790