नाशिक: अवजड वाहतुकीचे निर्बंध ३ जूनपर्यंत कायम; सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत बंदी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीस शहरात प्रवेश बंद करत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतूक विभागाने यासंदर्भात अधिसूचना काढली होती.

सिन्नर- पुणेकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक ही फेम सिग्नलवरून वडाळा-इंदिरानगर-पाथर्डीमार्गे मुंबईकडे जात होती. यात तात्पुरत्या स्वरूपात ५ मे ते ३ जून या ३० दिवसांकरिता प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील या परिसरात रविवार व सोमवार वाहतूक बंदी !

या मार्गावरील अवजड वाहतूक ही आता रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत फेम सिग्नल, काठे गल्ली सिग्नल, द्वारका सर्कल येथून डावीकडे वळून रॅम्पने मुंबई बाजूकडे जाईल.

तसेच मुंबईकडून सिन्न- पुणे कडे जाणारी अवजड वाहतूक ही प्रायोगिक तत्त्वावर पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वडाळा गाव, डीजीपीनगर, सम्राट सिग्नलमार्गे सिन्नर व पुणेकडे जाईल. तसेच ३० दिवसांच्या कालावधीत रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत अवजड वाहतूक सुरू राहील. सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790