नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): तुमचे एटीएम पिन जनरेट करून एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट करून देतो असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन पिन जनरेट करून एटीएम कार्ड बदलले व अकाउंटमधून ३८ हजार रुपये काढून घेऊन एकाची फसवणूक केल्याची घटना ओझर येथे घडली.
मंगळवारी (ता.३०) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अमोल अशोक चंदनशीव (रा. पिंपळस रामाचे, ता. निफाड) हे एटीएम पिन जनरेट करून एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट करण्यासाठी ओझर येथील बडोदा बँकेच्या एटीएममध्ये आले होते. तेथे एका अनोळखी व्यक्तीने चंदनशीव यांना तुमचे एटीएम कार्ड ॲक्टीव्हेट करून देतो, अशी बतावणी करून चंदनशीव यांचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून लबाडीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचे एटीएम कार्ड चंदनशीव यांना देऊन निघून गेला. त्यानंतर त्याने चंदनशीव यांचे अकाउंटमधून एटीमकार्डद्वारे नाशिक येथून ३८ हजार रुपये काढून घेतले.
यामुळे फसवणुकीची तक्रार अमोल चंदनशीव यांनी दिली आहे. ओझर पोलिसांनी अनोळखीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक डी एल वाघेरे करत आहेत