नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. धमकावून मारहाण करणे, खंडणी मागणे, वाहनांची जाळपोळ, जवळ शस्त्र बाळगणे असे विविध गुन्हे संबंधित आठ आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
टोळी प्रमुख दर्शन उत्तम दोंदे (२९रा. कामठवाडे), गणेश दत्तात्रय खांदवे (२८ रा. इंदिरानगर), राकेश कडू गरुड (३२, रा. उत्तमनगर, सिडको), अथर्व दिलीप राजधर ऊर्फ खग्या (२०, पाथर्डी फाटा), अजय रमेश राऊत (२७ रा. होलाराम कॉलनी), जितेंद्र अशोक चौधरी (२६, रा. बंदावणे नगर), महेश दत्तात्रय पाटील (२१, रा. सिडको), अक्षय गणपत गावंजे (सिडको) या आठही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अंबड पोलिस स्टेशन हद्दीत ७ एप्रिल २०२४ मध्ये गुन्हा घडला होता. फिर्यादी वैभव शिर्के व दर्शन दोंदे यांच्या वर्चस्वाच्या वादातून हाणामारी झाली होती. त्याचे पडसाद नंतर एक घटनेत उमटले.
वैभव हा दुचाकीने जात असताना दर्शनसह गणेश खांदवे, राकेश गरुड, अथर्व राजधिरे, अजय राऊत यांनी वैभववर गावठी पिस्तुलाने फायर करून तसेच कोयता व चॉपरने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने अंबड पोलिसांत गुन्हा दाखल होता.