नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): हिरावाडी रोडवरील नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना आग लागली होती. अग्नीशामक दलाने तात्काळ पोहचत आग आटोक्यात आणली.

मात्र, त्यालगत असलेली मारुती अर्टिगा वाहन जळून खाक झालेले असून आगेची तीव्रता एवढी होती की बाजूला असलेले गार्डन मधील साहित्य जळून खाक झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिरावाडी रोडवर नंदिनी अगरबत्ती पाठीमागे नंदिनी नगर आहे. या नंदिनी नगर मध्ये पंचवटीतील एका शेत उपयोगी अवजारे व मशिनरीचे दुकान आहे. मोकळ्या भूखंडावर दुकानातील शेत उपयोगी पाईप हे ठेवलेले होते. शुक्रवार ता.०३ रोजी सुमारे साडेचार वाजेच्या सुमारास या पाईपांना अचानक अचानक आग लागली. या परिसरातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते सागर दिघे यांनी अग्निशामक दल व पोलिस यांना संपर्क साधला. त्यावेळी पंचवटी पोलीस व अग्निशामक दलाचे तीन बंब लागलीच आले.
हिरावाडी रोडवर लागलेली इतकी भीषण होती की, मोकळा भूखंड लगत उद्यानात असलेली साहित्य जळून खाक झाले. या आग लागलेल्या पाईपालगत एकूण चार वाहन लावलेली होती. त्यात मारुती अर्टिगा जळून खाक झाली. मात्र , याअर्टिगा लगत एक टाटा सुमो, एक आयशर, व्हेरिटो हे वाहन होते. आगीची तीव्रता अधिक होती. यासाठी परिसरातील युवक बंटी कापुरे यांनी उन्हामुळे तापलेल्या गाड्यांना पाणी मारले आणि त्या वाहनांना देखील आग लागू नये याची खबरदारी घेतली.