नाशिक: उज्जैनहून येत असतांना नाशिकच्या उद्योजकाच्या कारचा अपघात; पत्नी ठार तर तीन जण जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उज्जैन येथील महाकालचे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला झोडगे गावाजवळ भीषण अपघातात ईनोव्हा कार मधील जयश्री संदीप नेरकर वय ४५ यांचे निधन झाले तर पती संदीप दगडू नेरकर (वय ५१), मुलगा मानस नेरकर (वय २३), मुलगी तनुजा नेरकर (वय १८) हे जखमी झाल्याने मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरूळला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

तर शेजारी बसलेले वाहन चालक ज्ञानेश्वर नेश्वर हातळकर यांना दुखापत झाली आहे. अपघात होताच गाडीच्या दोन एअर बॅग उघडल्याने मोठ्या संकटातून गाडीतील प्रवासी बचावले.

नाशिक येथील उद्योजक संदीप नेरकर हे आपल्या परिवारासह दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी पत्नी व दोन मुलांसमवेत कुलदेवी अन्नपुर्णा माता तसेच ओंकारेश्वर व उज्जैन येथील महाकालेश्वरच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर दि.२३ रोजी रात्री नाशिक कडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सतत वाहन चालवून थकलेल्या वाहन चालक ज्ञानेश्वर हाताळकर याला विश्रांती मिळावी म्हणून अपघात स्थळापासून अर्ध्या तासांपूर्वी सदर गाडी संदीप नेरकर यांनी चालवण्यासाठी घेतली होती.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

मात्र समोर चालत असलेल्या कंटनेरचा वेगाच्या अंदाज नआल्याने सकाळी ६.३० च्या दरम्यान बेंद्रेपाडा फाटा जवळ झोडगे शिवारातील हाँटेल निवांत समोर कंटेनरला मागून धडक दिल्याने कारचा भीषण अपघात झाला. त्यामुळे दुग्धव्यवसायिकांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करुन रुग्णवाहिकेतून मालेगाव येथे उपचारासाठी नेले असता जयश्री संदीप नेरकर यांना मृत घोषित केले. तर परिवारातील तीन सदस्य उपचार घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790