नाशिक: सिटीलिंकचे प्रवासी घटल्यामुळे अडीचशे २५० फेऱ्या कमी होणार

शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्याचा परिणाम

नाशिक (प्रतिनिधी): आधीच गेल्या अडीच वर्षांत जवळपास शंभर कोटींच्या तोट्याचा सामना करत असलेल्या सीटी लिंकपुढे आता उन्हाळ्यात शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे प्रवासी कसे मिळवायचे असा पेच निर्माण झाला आहे. रोज ८० ते ८५ हजार प्रवासी सिटी लिंकचा लाभ घेत असताना गेल्या महिनाभरात त्यात प्रतिदिन किमान १५ हजार प्रवाशांची घट झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

त्यामुळे तोट्यात बस चालवण्यापेक्षा ज्या मार्गावर प्रवासी मिळत नाहीत तेथील अनावश्यक २५० फेऱ्या कमी अर्थात रद्द करण्यात येणार आहेत. याबद्दलचे सध्या नियोजन सुरू आहे. कोणत्या मार्गांवरील फेऱ्या रद्द होणार हे सिटी लिंककडून जाहीर करण्यात येणार आहे.

८ जुलै २०२१ पासून सिटी लिंक व्यवस्थापनाने शहर बससेवा चालवण्याचे धनुष्य उचलले जवळपास २५० बसेस चालवल्या जात असून ६३ मार्गावरुन रोज ८० ते ८५ हजार प्रवासी सिटी लिंकचा लाभ घेतात. सिटी लिंकला आजपर्यंत १०० कोटींच्या घरात तोटा झाला आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

अनावश्यक फेऱ्यामुळे तोटा वाढणारच असल्याने त्या मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे तसेच शाळा व महाविद्यालयाची प्रवासी संख्या घटली आहे. अशा परिस्थीतीत प्रवासी संख्या सरासरी ६० हजारापर्यंत कमी आली असून प्रवासी संख्येत किमान १५ हजारापर्यंत घट झाली आहे. प्रामुख्याने सिटी लिंकला पासधारकांकडून मिळणाऱ्या महसुलात सर्वाधिक फटका बसला आहे. पासधारकांकडून तीनलाखाचे उत्पन्न अपेक्षित होते.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

रोज ४ लाखांचा फटका:
सिटी लिंकच्या माध्यमातून रोज ६३ मार्गावर २७०० बसफेऱ्या केल्या जातात. आता २५० फेऱ्या बंद करण्यात येणार असल्याने किमान ४ लाख रुपयांचा फटका बसणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790