नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून एका वृद्धासह तीन जणांना 66 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वसंत गोविंद वाघ (वय 61, रा. सप्तशृंगी कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. दि. 11 जानेवारी ते 21 मार्च 2024 या कालावधीत अज्ञात इसमाने फिर्यादी वाघ व त्यांचे इतर तीन साक्षीदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडले.
त्यानुसार फिर्यादी वाघ व इतर तीन साक्षीदारांनी अज्ञात इसमाने सांगितलेल्या बँक खात्यांवर सुमारे 65 लाख 76 हजार रुपयांची रक्कम जमा केली; मात्र त्याचा फायदा मिळत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादी वसंत गोविंद वाघ यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.