नाशिक: पोलीस आयुक्तालय हद्दीत 612 टवाळखोरांविरोधात कारवाई!

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणूक व शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये आयुक्तालय हद्दीतील ६१२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोडही उठली आहे.

👉 हे ही वाचा:  रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २९० टवाळखोर आणि तर, परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर.

👉 हे ही वाचा:  नाशिक: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद भरतीसाठी 18 जुलै रोजी मुलाखतीचे आयोजन

उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह चुंचाळे पोलीस चौकी या हद्दीत ३२२ टवाळखोर अशा ६१२ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अचानक राबविलेल्या या कारवाईमुळे रात्रीच्यावेळी उपद्रव माजविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790