दुपारी तीन वाजेपासून प्रवेश बंद !
नाशिक (प्रतिनिधी): श्री हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २३) मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक वझरे मारुती मंदिर, चौक मंडई, दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, एमजीरोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड पंचवटी अशी निघणार आहे. या मार्गावरील वाहतूक दुपारी ३ ते मिरवणूक संपेपर्यंत बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
या मार्गावर प्रवेश बंद: वझरे मारुती मंदिर, चौक मंडई, दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, एमजीरोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग: बागवानपुरा पोलिस चौकी ते अमरधामरोड ते पंचवटीकडे जातील व येतील. सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, शालीमार, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूरनाका, चोपडा लॉन्स, पंचवटीकडे जातील व येतील, पंचवटी कारंजाकडून येणारी वाहतूक मखमलाबादनाका, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाक्याकडे जातील व येतील. सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारी वाहतुक मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, गुरांचा दवाखाना, घारपुरे घाट, रामवाडी पूल, मखमलाबादनाकामार्गे पंचवटीकडे जातील व येतील,