नाशिक: खंडणीखोर वैभव देवरे मध्यवर्ती कारागृहात रवाना

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): खासगी सावकार वैभव देवरे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी (ता. २१) त्यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. देवरेसह त्याची पत्नी, नातलग व इतरांविरोधात जबरी चोरी, सावकारी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

दरमहा दहा टक्के व्याजदराने कर्ज वाटप करून खासगी सावकार वैभव देवरे याने अव्वाच्या सव्वा दराने कर्जवसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कर्जदारांच्या स्थावर मालमत्ता बळकावल्या. याप्रकरणी सुरवातीस इंदिरानगर पोलिस ठाण्यात विजय खानकरी यांनी देवरेविरोधात खंडणीची फिर्याद दिली. ३ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर कर्जफेड करूनही वैभवने खानकरी यांना शिवीगाळ करीत १२ लाख रुपयांची मागणी केली.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

याप्रकरणी ११ एप्रिलपासून वैभव पोलिस कोठडीत असून, त्यास रविवारी (ता. २१) पुन्हा न्यायालयात हजर केले. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने व तपासासाठी पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने वैभवला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

खासगी सावकारी केल्याप्रकरणी वैभवविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग, खासगी सावकारी याप्रकरणी कलम लावण्यात आले आहेत. संशयितांमध्ये वैभवसह त्याची पत्नी, सासरचे नातलग व मित्रांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790