नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या (अक्कलकोट) पालखी, पादुकांचे शहरात २९ एप्रिलला आगमन होत आहे. पालखी पादुकांचे हे २७ वे वर्ष आहे. २९ एप्रिल रोजी सकाळी चेतनानगर येथे पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या घरी आगमन होत असून सकाळी ९ वाजता आरती व १२ वाजता प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दिवशी पालखी येथे मुक्कामी असेल.
३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता केदार कुलकर्णी यांच्याकडे पादुका येतील. सकाळी १० वाजता इंदिरानगर येथे आशाताई नागरे यांच्या घरी तर दुपारी १२ वाजता भगवंतनगर, मुंबईनाका येथे भारती कुक्कर यांच्याकडे आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे पादुका दर्शनासाठी असतील.
सायंकाळी ५.३० वाजता पादुका श्री दत्तमंदिर, मुंबईनाका येथे येतील. यानंतर कालिका मंदिर येथे कालिकामाता आणि स्वामी समर्थांची भेट होऊन सायंकाळी ७ वाजता गणपती मंदिर, मेनरोड येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणूक बोहोरपट्टीमार्गे सराफ बाजारात येईल. येथे सोन्या मारुती मित्रमंडळातर्फे स्वागत केले जाईल. रात्री दुर्गा मंगल कार्यालय येथे आरती होऊन पालखी येथे मुक्कामी असेल.
१ मे रोजी सकाळी ८ वाजता लघुरुद्र, दुपारी १२ वाजता महाआरती आणि दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. २ मे रोजी टागोरनगर येथे मंदार तगारे यांच्या निवासस्थानी सकाळी ९ वाजता, दुपारी २ वाजता माणेकशानगर येथे राहुल जगताप यांच्या घरी, २.३० वाजता द्वारका येथे बळीराम चांडोले यांच्याकडे, त्यानंतर तपोवन-टाकळी रोडवरील समर्थनगर येथे वंदना जोशी यांच्याकडे ४ वाजता पादुका येतील. के. के. वाघ कॉलेजजवळील प्रवीण मुनोत यांच्या निवासस्थानी आरती व शीतपेयाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वाजता पालखी, पादुका पिंपळगावकडे रवाना होतील, अशी माहिती विश्वस्त श्याम तांबोळी, जगदीश पाटील आदींनी दिली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790