नाशिक: १५ ते २० जणांना तब्बल दोन कोटीहून अधिक रूपयांना गंडा; संशयिताला अटक !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये एकाने दांम्पत्यासह १५ ते २० जणांना तब्बल दोन कोटीहून अधिक रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतून जास्तीच्या मोबदल्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली.

तब्बल तीन वर्षापासून गाशा गुंडाळून हा भामटा पसार झालेला होता. हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद भरतीसाठी 18 जुलै रोजी मुलाखतीचे आयोजन

पंकज प्रभाकर बाविस्कर (रा. सुमन अपा.राम मंदिराजवळ,श्रीरामनगर वडाळा पाथर्डीरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत ज्योती राजेश दायमा (रा.अश्विननगर,सिडको) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने सन.२०१६ मध्ये वडाळा पाथर्डी रोडवरील आपल्या राहत्या ठिकाणी बाविस्कर एंटरप्रायझेस या नावाची फर्म स्थापन केली होती. गुंतवणुकीवर तीन वर्षात दामदुप्पट तसेच दामदुप्पट न झाल्यास १८ टक्के परताव्याची हमी दिली होती. अल्पावधीत भरधोस मोबदल्याचे प्रलोभन दाखविण्यात आल्याने दायमा दांम्पत्यासह अन्य १५ ते २० गुंतवणुकदारांनी संशयिताकडे तब्बल २ कोटी ८ लाख ५० हजार रूपयांची गुंतवणुक केली होती.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

मात्र हा भामटा मार्च २०२१ मध्ये कुटूंबासह फरार झाल्याने या घटनेवर पडदा पडला होता. बुधवारी (दि.१७) संशयित पंकज बाविस्करला आर्थिक गुन्हे शाखेने त्यास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२३/२०२४) संशयिताने अनेक गुंतवणुकदारांना गंडविल्याची चर्चा असून फसवणुक झालेल्या नागरीकांनी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790