नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास आठवा मैलाजवळ नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्या एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात तीन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
हे ही वाचा: शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !
इनोव्हा (एमएच १५ एचजी ६१७७) तसेच ओम्नी आणि तिसरी कार ही तीनही वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना पुढील चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एकमेकांवर आदळली.
त्यातील प्रवासी प्रवीण रोजेकर (५२) हिरल रोजेकर (४६, रा. सिडको, नाशिक) तर किसन धोंगडे (७४), रुख्मिणी धोंगडे (४८, रा. पाडळी देशमुख) हे जखमी झाले. गोंदे फाटा येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेसह चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातस्थळी पोहोचून जखमींना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790