नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील २८ जागा वगळता २६ जागांवरील बेकायदा होर्डिंग्ज पंधरा दिवसांत हटविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती कर उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली.
निविदेत फक्त जाहिरात फलक असा उल्लेख असताना कार्यारंभ आदेश होते. त्यासाठी एकच दर लावण्यात आले. जाहिरात व परवाना विभागात २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारल्याची नोंद असताना मात्र ६३ ठिकाणी जाहिरात फलक उभारले. यातून करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप असोसिएशनतर्फे करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला. २८ जागांच्या निविदा काढण्यात आल्या. त्याव्यतिरिक्त १५ ठिकाणी महापालिकेची परवानगी घेण्यात आली, तर ११ ठिकाणी परवानगी मिळण्यापूर्वी होर्डिंग लावण्यात आले. फक्त परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आले.
खुल्या जागांवर जाहिरात होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेने १६ डिसेंबर २०१९ ला निविदा काढली. जाहिरात व परवाने विभागातील कर्मचाऱ्यांनी करारातील अटी व शहर बदलून संगनमताने होर्डिंग्ज घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी नाशिक आउटडोअर अॅडव्हर्टायझेशन वेल्फेअर असोसिएशनने केला होता. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चौकशी समिती गठित केली होती.
अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने अहवाल तयार करून आयुक्तांकडे सादर केला. निविदेतील अटी व शर्ती निश्चित करताना विशिष्ट मक्तेदारांना लाभदायक ठरेल, अशा अटी तयार करण्यात आल्याचा आरोप होता. यातून महापालिकेचा करोडोंचा कर बुडाल्याचा दावा असोसिएशनने केला.