Amazon

नाशिक: नरेश कारडा यांच्यावर सव्वा कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): बांधकाम पूर्ण न करता, तसेच मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता ग्राहकांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विनोद विजय गाडेकर (रा. विपुल सिद्धी निवास, जुना चेहेडी रोड, नाशिकरोड) व इतर फ्लॅट खरेदीधारकांनी कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश जुगमल कारडा (वय 46, रा. साईकृपा कॉम्प्लेक्स, टिळक रोड, नाशिकरोड) व प्रवीण मुरलीधर जगताप (वय 40, रा. सायट्रिक, पंचक, जेलरोड) यांच्या कारडा कन्स्ट्रक्शन्सतर्फे सुरू असलेल्या खर्जुल मळा येथे हरी संस्कृती या इमारतीत फ्लॅट्सची बुकिंग केली होती

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दिवाळीनिमित्त शहरातील 'या' महत्वाच्या वाहतूक मार्गांत ९ दिवस महत्वाचे बदल; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या...

मात्र संशयित आरोपी नरेश कारडा व प्रवीण जगताप यांनी फिर्यादी गाडेकर व इतर फ्लॅट खरेदी धारकांकडून फ्लॅट ताब्यात देण्याचे आश्वासन दिले; मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता, तसेच मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता फ्लॅट खरेदीधारकांकडून वेळोवेळी 1 कोटी 25 लाख 27 हजार 81 रुपयांची रक्कम घेऊन विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते दि. 11 एप्रिल 2024 या कालावधीत घडला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पिकांचे अवशेष व नैसर्गिक गवताचे संवर्धन करण्याचे आवाहन

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित नरेश कारडा व प्रवीण जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २०५/२०२४) पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790