Amazon

नाशिक: नाशिकरोडच्या सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरोधात स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनुसार सराईत गुन्हेगारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

जय उर्फ माऱ्या उर्फ मारुती वाल्मिक घोरपडे (२१, रा. विहितगाव, नाशिकरोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सराईत गुन्हेगार जय याच्याविरोधात नाशिकरोड, उपनगर या पोलिस ठाण्यांमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखविणे, जबर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, प्राणघातक हल्ला, महिलांची छेडछाड, अपहरण, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे सुमारे ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

जय याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याच्यात सुधारणा न झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आणखी काही सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर स्वरुपाच्या कारवाई केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790