नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): विदर्भात तयार वाऱ्याच्या द्रोणीका रेषेमुळे वातावरणात बदल झाला आहे. ही रेषा विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक तसेच तामिळनाडूपर्यंत जात असल्याने येथील वातावरण कोरडे व ढगाळ राहील.
त्यामुळे ८ व ९ एप्रिल रोजी मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर, नांदेड येथे रविवारी उष्णतेची लाट जाणवेल.
दरम्यान, मालेगावमध्ये तीन दिवस ४२ अंशांवर पोहोचलेले तापमान ३ अंशांनी कमी म्हणजे ३९ अंश झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790