नाशिक: घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जुन्या जकात नाक्यासमोर नाशिक ते मुंबई महामार्गावर घंटागाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक ठार झाल्याची घटना घडली. तर एक जण जखमी झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

कलाम सुलेमान अन्सारी (वय ४२, रा. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर) असे मयताचे नाव आहे. तर प्रदीप पांडुरंग शिंदे हा दुचाकीवर मागे बसला असल्याने जखमी झाला आहे.

शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच ४८ – सीएफ ३९५६ ही नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात असताना अपघात घडला. पाठीमागून भरगाव वेगाने येणाऱ्या घंटागाडीने (क्र. एमएच १५ – एचएच ७९५०) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालकाच्या शरीरातून रक्तस्राव झाल्याने जागेवरच मृत्यू झाला. मागे बसलेला प्रदीप शिंदे हा जखमी झाला. यावेळी घटनास्थळी गर्दी झाली होती. वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790