नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता नाशिक – दिंडोरी मार्गावर ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत.
तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल होऊन मदतकार्य सुरु केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि. 05) दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत.
टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज:
अपघात इतका भीषण होता की दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
UPDATE: या भीषण अपघातात बोलेरो वाहनातील तिन जण तर मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बोलेरो वाहनातील मुकेश कुमार यादव (25), अमन रामकिसन यादव (18),कुसूमदेवी रामकिसन यादव (45) सर्व रा. ड्रिम कॅसल, नाशिक, (मुळ रा. बनारस, युपी), तर मोटारसायकलवरील अनिल चिमाजी बोडके आणि राहुल अनिल बोडके यांचा जागीच मृत्यू झाला.