Amazon

नाशिक: दुचाकी-चारचाकीच्या अपघातात ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर येथे दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ७ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

दुचाकीवर राहुल पाटील हे त्यांचा मुलगा सत्यम (वय: ७) याला घेऊन घराकडे जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी आणि चारचाकीत अपघात झाला. या अपघातात सत्यमला गंभीर दुखापत झाली. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दिवाळीनिमित्त शहरातील 'या' महत्वाच्या वाहतूक मार्गांत ९ दिवस महत्वाचे बदल; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या...

घटनेनंतर अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रात्री उशिरापर्यंत तपास आणि गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790