नाशिक (प्रतिनिधी): सासरच्या जाचाला कंटाळून मखमलाबादला एका 35 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी सासू व पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मधुकर वायकंडे (वय: ६२, राहणार: लोखंडे मळा, दसक, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुंबईला फ्लॅट घेण्यासाठी मयत कावेरी आशिष खोडे (वय 35) हिच्याकडे सासू सिंधुबाई खोडे व नवरा आशिष खोडे हे गेल्या अनेक वर्षांपासून 10 लाख रुपये आणण्यास सांगत होते.
यासाठी ते तिला नेहमी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. सासरच्यांच्या या जाचाला कंटाळून अखेर तिने गळफास घेत जीवन संपवले. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६८/२०२४.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790