नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या वाहन तपासणीत शहरात कारमधून बेकायदा दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या कारवाईत एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारूती सचिन गव्हाणे (रा.सुमनराज रो हाऊस,देवी मंदिररोड शिंदेगाव) असे संशयित आरोपी कारचालकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे पोलीस नाईक भुषण सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
एक इसम उपनगर येथील भीमराव रामराजे मार्गावर विनापरवाना विदेशी दारूची चारचाकी वाहनातून वाहतुक करून विक्री करणार आहे, अशी गुप्त माहिती पोलीस नाईक भुषण सोनवणे आणि पोलीस अंमलदार जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने भारत सरकार मुद्रणालय परिसरात पथकाने सापळा रचला. रात्री ८. ३० च्या सुमारास माहिती मिळाल्याप्रमाणे मारुती डिझायर कार क्रमांक: एमएच १५, डीएम: ९९७९ ही कार उभी दिसली.
संशय बळावल्याने कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये २५ हजार ९८० रुपये किमतीचा दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा तसेच गुन्ह्यात वापरलेली २ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार जप्त केली आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस उपनिरीक्षक सगळे, पोलीस हवालदार रोकडे, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस नाईक भूषण सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.
![]()


