नाशिक: IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपी गुन्हे शाखेच्या युनिट -१ ने जेरबंद केला आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलीस उप आयुक्त (गुन्हेशाखा) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) डॉ. सिताराम कोल्हे यांनी सध्या चालु असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणा-या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

दिनांक २६ मार्च २०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आडगाव परिसरातील हॉटेल राजेशाही दरबार, औरंगाबादरोड, नांदुरनाका नाशिक या हॉटेलच्या पाठीमागे उघडयावर बसुन निशिकांत पगार नावाचा इसम हा सध्या चालु असलेल्या IPL २०२४ च्या चैन्नई सुपर किंग विरुध्द गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याचे त्याच्या मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैजा लावुन जुगार खेळुन स‌ट्टा चालवित आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळविली. पथकाने हॉटेल राजेशाही दरबार, औरंगाबादरोड, नांदुरनाका नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. निशिकांत प्रभाकर पगार (वय ३७ वर्षे, रा-सदिच्छा नगर, इंदिरानगर नाशिक) यास पथकाने ताब्यात घेवुन त्याच्याकडून १८००० रुपये किंमतीचा बेटींग लावण्याकरीता वापरण्यात येणारा ०१ टॅब, ०२ मोबाईल असा मु‌द्देमाल हस्तगत करून सदर इसमाविरुध्द आडगाव पोलीस ठाणे येथे पोहवा /१८८३ विशाल काठे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन गुन्हा दाखल केला करून गुन्हयातील मुद्देमाल पुढील कारवाईकामी आडगाव पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार: वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड, पोलीस नाईक: प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोलीस अंमलदार: अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे नाझीमखान पठाण यांच्य टीमने ही कारवाई केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here