नाशिक: शहरातील ‘या’ भागांत बुधवारी (दि. २७ मार्च) पाणीपुरवठा बंद

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे दुरुस्तीचे तसेच स्मार्ट सिटीमार्फत शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र फिल्टर बेडचे वॉल बदलण्याची कामे तातडीने करणे आवश्यक असल्याने बुधवारी (ता.२७ मार्च, २०२४) शहराच्या काही भागात पाणी पुरवठा बंद तर गुरुवारी (ता.२८ मार्च, २०२४) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी इतर आनुषंगिक कामे, अमृत मनी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती बंद करणे, शिवाजीनगर मेघा इंडस्ट्रीज व संदीप प्लॅस्टीकच्या कंपाउंड लगतची ५०० मिलिमीटर व्यासाची पीएससी लाईन पाणी गळती बंद करणे अशी दुरुस्तीची होणार आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद:
सातपूर विभागातील सर्व प्रभाग व संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक आठ ते अकरा, २६ व प्रभाग क्रमांक २७ (भागश:) मधील चुंचाळे, दत्त नगर, माऊली चौक. पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सात मधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांती निकेतन आदी.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जमीन हडपून खंडणीची मागणी; लोंढे पिता-पुत्रासह पाचजणांवर गुन्हा

प्रभाग क्रमांक १२ मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थ नगर कामगार नगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटे नगर, पत्रकार कॉलनी, पी.टी.सी., संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांती नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुल नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गडकरी चौक व गायकवाड नगर परिसर इत्यादी.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ (भागश: परिसर) इंद्रनगरी परिसर, कामठवाडा, धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मी नगर, दत्त नगर, मटाले नगर. प्रभाग क्रमांक २६ (भागश: परिसर) शिवशक्ती नगर, आयटीआय पुलाजवळील परिसर, बॉम्बे टेलर परिसर

प्र.क्र २७ (भागश: परिसर) चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलिबाबा नगर, अंबड मळे परिसर, प्रभाग क्रमांक २८ (भागश: परिसर) खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, अंबड गांव, महालक्ष्मी नगर.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here