नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एमजी रोडवरील मोबाइल दुरुस्ती व स्पेअरपार्ट विक्री करणारे व होलसेल साहित्य विक्रीवरून सुरू स्थानिक-परप्रांतीय अशा वादाने बुधवारीही (दि. २०) २५० दुकाने बंदच होती. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना माघारी फिरावे लागले. या बंदमुळे दोन दिवसांत ६० लाखांहून अधिक उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
एमजीरोड परिसरातील मोबाइल दुकानदारांकडून स्थानिक आणि राजस्थानी असा वाद मंगळवारी (दि. १९) निर्माण झाल्याने परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवत दुकानदारांनी निषेध नोंदविला होता. या मार्केटध्ये शहरासह जिल्हा आणि लगतचे जिल्हे, गावांमधील किरकोळ विक्रेतेही खरेदीसाठी येत असतात. मागील दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी किरकोळ कारणांमुळे दुकानदारांमध्ये वाद होत आहे.
हे आहे वादाचे कारण:
राजस्थानी दुकानदारांनी केवळ होलसेल साहित्य विक्री करायची आणि स्थानिकांनी मोबाइल रिपेअरिंग व इतर साहित्य विक्री करावी अशी मागणी काही दुकानदारांकडून करण्यात आल्याने वाद होत आहे.
![]()


